स्वतःचे काळीज देऊन भावाला वाचवणाऱ्या बहिणीचा मृत्यू

Published on -

Maharashtra News : स्वतःचे यकृत दान करून भावाचा जीव वाचविणाऱ्या धाडसी बहिणीने या जगाचा निरोप घेतला. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. लाडक्या बहिणीच्या पार्थिवावर पळसखेड चक्का येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंढेरा येथील शेतकरी तथा हॉटेल व्यावसायिक रमेश नागरे यांना पळसखेड चक्का (ता. सिंदखेड राजा) येथील त्यांची धाकटी बहीण दुर्गा अरुण धायतडक यांनी यकृत दिले.

पंधरा दिवसांपूर्वी यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. भावाची प्रकृती चांगली असलीतरी सध्याही त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. बहीण दुर्गा यांची प्रकृतीदेखील चांगली होती.

मात्र, गुरुवारी तब्येत बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी पळसखेड चक्का येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला अश्रू अनावर झाले. तर धायतडक व नागरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News