Suger Price : सद्यःस्थितीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत दरात प्रति क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यंदा उत्पादन कमी निघण्याचा अंदाज आहे. मात्र, मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
राज्यातील बहुतांशी साखर कारखाने हे १ नोव्हेंबरपासून सुरु होत आहेत. कारखाने सुरु झाल्यावर आवक वाढेल, परिणामी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये काही प्रमाणात दर कमी होतील.
दिवाळी सणामुळे साखरेला मागणी वाढली आहे. मागणी लक्षात घेऊन शासनाने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा कोटा वाढवून दिला आहे. त्यामुळे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
मात्र, यंदा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्याने दिवाळीनंतर दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी हंगामात साखरेचे उत्पादन ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
सध्या घाऊक बाजारात ४ हजार रुपये प्रतिक्विंटल, असे भाव आहेत तर किरकोळ बाजारात ४१ ते ४२ रुपये प्रतिकिलो दराने साखरेची विक्री केली जात आहे. यंदा उसाची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे.
मात्र, पाऊस कमी असल्याने साखरेचा उतार कमी मिळेल, असा अंदाज आहे. पावसाअभावी उसाची अपेक्षित वाढ होत नसल्याने उत्पादन घटेल.