आज २३ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा रॅली आयोजित केली होती. यावेळी लाखो मराठा समाज बांधव येथे जमले होते. संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले होते. या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली आहे.
२० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील. मराठा समाज बांधव मनोज जरांगे उद्याच्या २४ डिसेंबर रोजी मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढणार होते. त्यावर आज या सभेत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
काय झाला निर्णय? :- मनोज जरांगे पाटील यांनी उद्या मुंबईतील ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी आता २० जानेवारी रोजी तारीख ठरवली आहे. २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.
या वेळी सर्व मराठ्यांनी मला भेटायला या असे आवाहन केलं आहे. त्यामुळे सरकार आपल्याला कसे अडवेल? असा प्रश्नही त्याची विचारला आहे. त्यामुळे आता २० रोजी मराठा समाज आझाद मैदानात दाखल होईल.
३ कोटी मराठे मुंबईत येतील:- २० जानेवारी रोजी मुंबईत ३ कोटी मराठे मुंबईत येतील असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मोठा जनसमुदाय याठिकाणी येईल. सर्वानी पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
भुजबळ यांच्यावर टीका :- मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो असा इशाराच त्यांनी दिला आहे. सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील अशी टीका केली आहे. तसेच त्यांनीच पाहुण्याचं हॉटेल जाळलं व आमच्या पोरांची
आरक्षण द्या, आम्ही सरकार बरोबर :- सरकारने कसलाही घात करू नये. सरकारसोबत आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सरकराने चांगला विचार करावा व आरक्षण द्यावे. सरकारने आरक्षण दिल्यास आम्ही कायम सरकारसोबत राहू असे ते म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटमवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या सभेनंतर प्रतिक्रिया देत आपले म्हणणे मांडले आहे. ते म्हणाले आहेत की, आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असून क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला कोर्ट ऐकणार असल्याने मराठा समाजासाठी मोठा दिलासा आता मिळालेला आहे.
24 जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज त्याठिकाणी बाजू मांडेल व मराठा समाज मागास कसा आहे हे त्याठिकाणी सांगणार आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचं काम वकिलांची फौज करून समाजाला न्याय देण्याचे काम करेल.
आता मराठा सामाजाला न्याय मिळेल तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तसेच कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझं आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल.