Maharashtra News : शिव पाणंद रस्ते अभियानातून शेतकऱ्यांमधील वाद संपुष्टात येऊन समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण हाईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केले.
शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे आयोजित शिव पाणंद रस्ते चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी पवळे बोलत होते.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/12/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-12-08T153256.868.jpg)
शेत रस्त्यांमुळे अनेक वाद निर्माण होत असून, शेतकऱ्यांना आर्थिक व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. शरद पवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
शेत पाणंद शिवरस्ते यावर मागणी अर्ज केल्यानंतर ६० दिवसांत निर्णय निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले असून, सार्वजनिक शिव पाणंद रस्त्यांची मोजणी आणि रस्ता करून देण्याचा खर्च हा प्रशासनाने करायचा असल्याचे आदेश निकालात दिले आहेत.
शेतकऱ्यांनी आता तहसील कार्यालयात रस्ते मागणीबाबत अर्ज करावा. शेत ग्रामसमिती स्थापन करून सरपंच, ग्रामपंचायत, तंटामुक्ती अध्यक्षांनी प्रशासनाकडे रस्त्यांची मागणी करावी. या वेळी तालुक्यात शिव पाणंद रस्ते कृती समिती स्थापन करण्याच ठरले.
या वेळी श्रीगोंदा मार्केट कमिटीचे संचालक अजित जामदार, संदीप रोडे, परेश वाबळे कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र निळकंठ नागवडे, अॅड. गोरख कडूस, दादासाहेब जंगले, सुनील गायकवाड सर, किरण कुरुमकर तसेच सतीश डेबरे, शेतकरी नेते टिळक भोस, उमेश बोरुडे,
मिलिंद नागवडे, रामचंद्र अडसरे, पांडुरंग जगदाळे, माजी सरपंच फुलसिंग मांडे, अमोल गाढवे, विजय नागवडे, ग्रामपंचायत सदस्य तुषार नागवडे, गुरू गायकवाड, राजेंद्र उंडे, भाऊसाहेब गवळी, प्रवीण फापाळे, अतुल दरेकर,
दत्तात्रय दरेकर, छगन होले, अनिल भुजबळ, अशोक कणसे, विलास कुरूमकर, शंकर साबळे, भानुदास वाघ, मधुकर जगताप, प्रदीप घोरपडे, शिवाजी ढमे, संजय गायकवाड,
राहुल खोडवे, आनंद लगड, राजेंद्र रोडे, दिलीप होले, बाळासाहेब बनकर, श्रीकांत कांडेकर उपस्थित होते. या वेळी पवळे यांनी शेतकऱ्यांना शिव आणि पाणंद रस्ते मोकळे करून देण्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले. राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी आभार मानले.