Maharashtra news:करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस मोफत दिल्यानंतर आता तिसरा म्हणजे बुस्टर डोसही मोफत देण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहे.
केंद्र सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. आरोग्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या ७५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत.
सुमारे ७७ कोटी नागरिकांना यांचा लाभ मिळणार आहे. ६० वर्षांवरील नागरिकांना यापूर्वीच हा लाभ देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या डोसमधील अंतर ९ महिन्यांवरून ६ महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.