शासन मेहेरबान ! चार धाम यात्रेला जा, प्रवासासह सर्व फुकट, ‘या’ कागदपत्रांसह ‘असा’ करा अर्ज

शासनाने राज्यातील वयोवृद्धांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना देशभरातील तब्बल ६६ तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदानही मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
shinde

शासनाने राज्यातील वयोवृद्धांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना देशभरातील तब्बल ६६ तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदानही मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

शासनाची जी काही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्यात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा, तसेच इतर धर्मियांची काही तीर्थक्षेत्रे असून अहमदनगरमधील शिर्डी, शनिशिंगणापूर, सिद्धटेक व भगवानगड या तीर्थस्थळांचा देखील समावेश आहे.

ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी ही योजना आहे.

लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे ?
योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,

जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असणे

अनिवार्य) किवा पिवळे/केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाइकांचा मोबाइल क्रमांक, योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अर्ज कसा , कोठे कराल?
पोर्टल, मोबाइल अॅप /सेतू सुविधा केंद्राद्वारे या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरला जाऊ शकतो. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल, ज्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल,

त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक. वय वर्षे ६० आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe