“ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मंत्री केंद्रीय तपासयंत्रणांच्या (ED) रडारवर आहेत. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) व विरोधी पक्ष भाजप (Bjp) यांच्यातील ईडीवरून वाद मिटताना दिसून येत नाही.

यावरूनच आता काँग्रेस (Congress) नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी सोलापूरमध्ये (Solapur) काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान प्रणिती शिंदे यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरावरून प्रणिती शिंदे यांच्या समवेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप (Bjp) व मोदी यांच्या विरोधात “ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है” अशी घोषणाबाजी केली आहे.

तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आता जे या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत, हाच गेम त्यांच्यावरच उलटणार आहे. आता तेच होताना देखील दिसत आहे.

शेवटी या सगळ्या संस्था स्वायत्त आहेत. काँग्रेसने कधी त्यांचा वापर केलेला नाही. आमची तशी संस्कृती देखील नाही. कधी ना कधी ते उलटतेच, असे टीकास्त्र प्रणिती शिंदे यांनी सोडले.

तसेच ईडी ठराविक गुन्ह्यांमध्येच तपास करते. त्यांनी तशाच प्रकारे निवडक गुन्ह्यांमध्ये तपास करायला हवा. पण आता कुणी छोटे काही केले तरी हे ईडी आणतात असे त्या म्हणाल्या आहेत.

त्याचसोबत परवा कोल्हापुरात चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्ही पेटीएमवर काही केले तरी ईडी येईल. म्हणजे यांनी हे सिद्ध केले आहे की ईडी त्यांच्यासाठीच काम करते आणि मागच्या दारात बसली आहे, असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe