मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.(University Mumbai)

या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे इतर अनेक मान्यवर या सोहळय़ास हजर राहणार आहेत.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या यूटय़ूब चॅनलवर होणार आहे. या सोहळ्यात २ लाख १२ हजार ५७९ स्नातकांना पदव्या, तर २४३ स्नातकांना पी.एचडी तर १९ पदके प्रदान केली जाणार आहेत.

त्याशिवाय डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डि.लीट. तर डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्रात डी.एस्सी. पदवी प्रदान केली जाणार आहे.

विविध विद्याशाखांतील एकूण २,१२,५७९ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. पदवीसाठी १ लाख ७९ हजार ७०६, तर पदव्युत्तरसाठी ३२ हजार ८७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

यामध्ये मानव्यविज्ञान शाखेच्या २५ हजार ५९३, आंतरविद्याशाखेच्या १० हजार ९८, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या १ लाख १७ हजार ८३२ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या ५९ हजार ५६ पदव्यांचा समावेश आहे.

तसेच विविध विद्याशाखेतील २४३ स्नातकांना विद्यावाचस्पती ( पी.एचडी,) तर डॉ. श्रीनिवासन कन्नन यांना संस्कृत विषयात डी.लीट. आणि डॉ. मुकुंद चोरघडे यांना रसायनशास्त्र विषयात डी.एस्सी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १८ विद्यार्थ्यांना १९ पदके प्रदान करण्यात येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!