रुग्णालयात मला मारुन टाकण्याची योजना होती; नितेश राणेंचा आरोप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Maharashtra news :-शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यावेळी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे, तसंच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे कोल्हापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला मारण्याचा सरकारचा डाव होता, असा आरोप करत राणेंनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिलीय.

“सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर मला एका प्रकरणात गोवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मला पोलिसांचा आणि प्रशासनाचा जो अनुभव आला तो थक्क करणारा होता.

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात मला दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मला सिटी एन्जोग्राफी करण्याचा आग्रह केला. त्यावेळी माझे ब्लड प्रेशर लो होते ते मला कळत होते.

तरीही डॉक्टरांनी सिटी एन्जो करायला सांगितली. तिथे सगळेच सरकारच्या बाजूचे नव्हते काही आमच्याही ओखळीचे होते. तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितले की सिटी एन्जो करु नका.

कारण त्यानिमित्ताने शाई शरिरात टाकायला लागते. शाई टाकून तुम्हाला मारुन टाकण्याची योजना आहे. मला मारुन टाकण्याची योजना आहे असे तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितले.

त्यांनी यासाठी होकार देऊ नका असेही सांगितले,” असे नितेश राणे यांनी म्हटले. “माझे ब्लडप्रेशर, शुगर लेव्हल लो दाखवत असतानाही रात्री २०० पोलीस मला घेऊन जाण्यासाठी पाठवण्यात आले.

पोलिसांना रात्री अडीच वाजता येऊन माझी अवस्था खराब असल्याचे पाहिल्यानंतर तेव्हा ते बाहेर गेले. तरीही वारंवार दबाव येत होता आणि मुंबई कलानगरच्या परिसरातून फोन येत होते. विरोधी पक्षातल्या नेत्यांना जीवंतच ठेवायचे नाही असा प्रकार राज्यात सुरु आहे,” असे नितेश राणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News