शहरातील खड्यांबाबत महापौरांनी दिल्या या सूचना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातील खड्यांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहेत. खड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकरण देखील रंगू लागले होते.

मात्र आता याच खड्‌ड्यांवरून आंदोलने सुरू झाल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी मनपा बांधकाम विभागाची बैठक घेतली.

महापौर वाकळे यांनी या बैठकीत शहरात तातडीने पॅचिंगचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. महापौर कार्यालय झालेल्या या बैठकीस शहर अभियंता सुरेश इथापे,

अभियंता श्रीकांत निंबाळकर व मनोज पारखे, संजय ढोणे आदी उपस्थित होते. महापौर वाकळे म्हणाले, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याचे नियोजन यापूर्वीच केलेले आहे.

परंतु पाऊस सुरू असल्याने पॅचिंग कामात अडचणी येत आहेत. ज्या रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत तेथे पावसामध्ये पॅचिंग कसे करता येतील, याचा विचार करून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना शहर अभियंता इथापे यांना दिल्या.

तसेच शहरामध्ये काही रस्ते मंजूर असून ठेकेदार काम करीत नसेल तर त्यांना नोटीस देवून पाऊस थांबल्यानंतर तातडीने काम सुरू करणे बाबत कळविण्यात यावे. यावरही काम करीत नसतील तर संबंधित ठेकेदाराकडील काम काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment