राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत ; जाणून घ्या आजचे दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नसून तब्बल तीन महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

तसेच निवडणुकांनंतर मात्र पुन्हा एकदा देशात पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार असल्याचंही बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe