अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयात आज सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होत आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुन्हा पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज्य सरकारने नव्या याचिकेत केली आहे.(OBC reservation)
त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे.

त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने तसे राज्य निवडणूक आयोगाला आदेशही दिले.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे 21 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणूक आयोगानेही ओबीसी जागा वगळून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार नगर जिल्ह्यासह नगरपंचायत, तसेच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे.
यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी घेण्यात येणार आहे, यामुळे आज काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम