विरोधकांना लोकशाही व जनतेची नव्हे तर केवळ आपल्या ‘इंडिया’ आघाडीची चिंता

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राजधानी दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंधित राष्ट्रीय राजधानी दिल्ली परिसर सरकार दुरुस्ती विधेयक- २०२३’ गुरुवारी लोकसभेत जवळपास चार तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. आप व काँग्रेससह विविध पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला.

पण विरोधकांना लोकशाही व जनतेची नव्हे तर केवळ आपल्या ‘इंडिया’ आघाडीची चिंता आहे. पण किती आघाडी केल्या तरीही २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील, असे म्हणत गृहमंत्री अमित शाहांनी विरोधकांचा समाचार घेतला.

दरम्यान, सभागृहात चर्चेदरम्यान, अध्यक्षांसमोरील येऊन कागद फाडून फेकल्याबद्दल आपचे सदस्य सुशीलकुमार रिंकू यांच्यावर अधिवेशनाच्या उर्वरित सत्रापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली.

यावेळी अमित शाहांनीही दिल्लीत कायदा करण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारला असल्याचे यावेळी स्पष्ट केले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीबाबत घेतलेल्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe