अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- सध्या कोविडचा प्रादुर्भाव प्रथमदर्शनी कमी झालेला दिसत असला, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वर्तवली असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंग, गर्दी न करणे, अतिगर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सिव्हिल हाॅस्पिटलला भेट देऊन तेथील कोविड सेंटर, सोयी-सुविधा, वैद्यकीय साधन सामुग्रीची पाहणी करताना हे आवाहन केले.
डॉक्टर, अधिकारी, स्टाफ, नर्सेस यांच्याकडून माहिती घेऊन त्यांना काही सूचना दिल्या. कोविडची लाट परत आली, तर सुसज्जता कशी वाढवता येईल, याबाबतही त्यांनी चर्चा केली.
कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची डॉ. भोसले यांनी भेट घेतली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दर्शना धोंडेे,
डॉ. महावीर कटारिया, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, कोविडचे जिल्हा समन्वयक डॉ. बापूसाहेब गाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ. संदीप कोकरे,
डॉ. विशाल केदारे, डॉ. धनंजय वारे, रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. भूषण रामटेके, मुख्य अधिसेविका विद्युल्लता गायकवाड, लॅब टेक्निशियन माया कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पोखरणा यांनी सिव्हिलच्या कामकाजाची माहिती दिली. अवघ्या २१ दिवसांत पीसीआर लॅब आम्ही सुरु केली. राज्यातील ही पहिली टेस्टींग लॅब होती.
अत्याधुनिक मशिनरीद्वारे तपासणी केली जाते सर्व स्टाफ रात्रं-दिवस काम करत असून, कोविडवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved