राणा दाम्पत्य हे भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल, त्यांनी भाजपची नोकरी स्वीकारली असून, सध्या ते रोजंदारीवर..

Published on -

मुंबई : प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर (Adv. Dilip Edatkar) यांनी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व रवी राणा (Ravi rana) यांच्यावर निशाणा साधला आहे.

राणा दाम्पत्य भाजप (Bjp) नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल ( Delivery Couple of Zomato Company) आहेत. एकाच वेळेस भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन होड्यांमध्ये ते स्वार आहेत.

खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी जोडपे खेळत आहेत. तसेच आगामी ऑलम्पिकमध्ये कोलांटउडी हा खेळ ठेवल्यास नवनीत राणा (Navneet Rana ) यांना गोल्डमेडल मिळेल, याची शंभर टक्के खात्री असल्याचा टोलाही ॲड. दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.

तसेच राणा दाम्पत्याने भाजपची नोकरी स्वीकारली असून, सध्या ते रोजंदारीवर आहेत. मुंबईत (Mumbai) अटक झाल्यानंतर भाजपने आपल्याला हवी तशी साथ दिली नाही.

नोकरीत कायमही केले नाही म्हणून नाराज असलेल्या जोडप्याने दिल्लीत हनुमान चालिसा पठणाचा “शो” केला खरा, परंतु अद्याप त्यांच्या आकांनी त्यांची दखल घेतलेली नाही. म्हणून आता प्रसिद्धीमाध्यमांना या दाम्पत्याने हाताशी धरले आहे. असा टोलाही ॲड. दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची (Maharashatra) दुर्दशा होत आहे. म्हणून दिल्लीत हनुमान चालिसा पठण करणाऱ्या नवनीत राणा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी या क्षणापर्यंत तरी साधी भेटही दिलेली नाही.

तरी लोचटाप्रमाणे दिल्लीतच ठाण मांडून बसलेल्या राणा दाम्पत्याने आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बियाण्याचा, खतांचा भेडसावणारा प्रश्न मतदारसंघात हनुमान चालिसा पठण करून सोडवावा, असे आवाहन दिलीप एडतकर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News