महाविकास आघाडीचे शिल्पकार अडकले चौकशीच्या फेऱ्यात, पवारांनाही नोटीस

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra Politics : राज्यात सत्तांतराचा खेळ रंगत असताना महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोघेही सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. पवार यांना आयकर खात्याने (आयटी) नोटीस पाठवली आहे.

तर राऊत यांना इडीचे समन्स आले आहे. राऊत यांना दोन दिवसांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. त्यामध्ये ते आज चौकशीसाठी हजर होणार आहेत. याच दरम्यान पवार यांनाही नोटीस आल्याचे उघड झाले आहे.

स्वत: पवार यांनी रात्री पत्राकार परिषदेत पत्रकारांना ही नोटीसच दाखविली. ते म्हणाले, मला आयकर खात्याने प्रेमपत्र पाठवले आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये मी निवडणुकांना उभे राहताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

या प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या अनुषंगाने मला ईडीने सगळ्या वर्षांसाठीच्या नोटीस आता एकत्र पाठवल्या आहेत. सुदैवाने या सगळ्याची माहिती माझ्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे ती माहिती द्यायला मला काही चिंता नाही. राऊत हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत.

संजय राऊत यांनी सकाळीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. ईडीने पाठवलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि केंद्रीय तपासयंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी चौकशीला गेल्यानंतर शिवसैनिकांनी ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करु नये, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe