मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापत आहे. या हल्ल्यात सोमय्या यांना दुखापत देखील झाली आहे.
हा हल्ला चिंताजनक असून महाराष्ट्रातील (Maharashatra) परिस्थितीचा अभ्यास करू. गरज पडली तर केंद्रीय गृहखात्याची (Home ministry) टीम महाराष्ट्रात पाठवू असे आश्वासन केंद्र सरकारचे (Central Government) गृहसचिव अजय भल्ला (Ajay Bhalla) यांनी दिले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी स्पष्टीकरण दिले असून गृहसचिवांशी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर (Maharashtra police) जवळपास ३० ते ३५ मिनिटं चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे.
या भेटीतील चर्चाबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, ‘गृहसचिव अजय भल्ला यांच्याशी आमचं डिटेल डिस्कशन झाल. ३०-३५ मिनिटं चर्चा झाली. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे.
सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत.. धमक्या येतायत.. जिवंत गाडण्याची भाषा केली जातेय..मुख्यमंत्री, त्यांचे प्रवक्ते करत आहेत. त्यांच्या अनेक तक्रारी इथे आल्या आहेत. सात उदाहरणं आम्ही दिली आहेत. या सगळ्याची उदाहरणंही आम्ही दिली आहेत.
हा विषय फक्त सोमय्याचा नाही, तर नेवीच्या अधिकाऱ्याचाही आहे. झोपडपट्टी राहणाऱ्यांना धमकावण्याचा आहे.. शिवसेनेचे गुंड नेव्ही अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्याला मारतात. मनसुख हिरनची दोन पोलीस अधिकारी सुपारी घेऊन हत्या करतात, या थरापर्यंत कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
तसेच स्वतः वरील हल्ल्याचा जाब विचारताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘आमदार खासदारांना जिवंत गाडण्याची धमकी दिली जाते. किरीट सोमय्यांना केंद्रानं झेड सुरक्षा दिली आहे आणि त्यांच्यावर पोलिसांच्या आवारात त्यांच्या देखतच जीवघेणा हल्ला करतात.
हे असं कसं घडू शकतं? त्यासाठी स्पेशल टीम पाठवा, अशी विनंती आम्ही केली. गृहसचिवांनीही आश्वस्त केलंय की आम्ही गंभीर दखल घेऊ, अभ्यास करु. गरज पडल्यास येथील टीमही महाराष्ट्रात पाठवू असे आश्वासन दिल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले आहे.