टेम्पोचे चाक निखळले अन त्या चाकाने ७० फुटांवरील युवकाचा घेतला बळी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे झालेल्या विचित्र अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या महामार्गावरून ४०७ टाटा टर्बो टेम्पो भाजीपाला घेवून जात असताना टेम्पोचे चालते चाक निखळले. निखळलेले चाक सुमारे ७० फुटावर वेगाने धावत जावून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या युवकाच्या डोक्यावर जावून आदळले.

यात त्या युवकच मृत्यू झाला. गुरुवारी राञी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.संदिप बाळासाहेब जोंधळे (वय ३३) असे या मृत युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे,

की नगरहून – औरंगाबादच्या दिशेने भाजीपाला घेवून चाललेल्या टेम्पोचे भरधाव वेगात चालत्या वेळेत चाक सुटून संदिप बाळासाहेब जोंधळे (वय ३३) या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे औषधोपचार करण्यापुर्वीच दुर्देवी निधन झाल्याने नेवासा शहरासह नेवासा फाटा परिसरात सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment