कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज रथयात्रा मार्गावर ए. बी. विद्युत केबल टाकण्याचा शुभारंभ काल कर्जत येथे युवक नेते प्रविण घुले व नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या हस्ते करण्यात आला, यामुळे रथयात्रेच्या दिवशी कर्जत शहरातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, कोठेही अंधार होणार नाही, असे प्रतिपादन कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले केले.
विद्युतीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. कर्जत येथे रथयात्रा काळात सुरक्षिततेसाठी वीज पुरवठा बंद करावा लागत होता. यामुळे ज्या भागात रथ आहे तो भाग अंधारात असायचा. हा प्रश्न युवा नेते प्रविण घुले यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे मांडला, त्यांनी या कामाला तत्काळ मंजुरी दिल्याने या कामाचा काल शुभारंभ करण्यात आला.

या वेळी युवा नेते प्रविण घुले, कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, पाणी पुरवठा सभापती सतीश पाटील, बांधकाम सभापती भास्कर भैलुमे, महिला व बालकल्याण सभापती मोहिनी पिसाळ, उपसभापती सुवर्णा सुपेकर, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, नगरसेविका ताराबाई कुलथे, छायाताई शेलार, मोनाली तोटे, लंकाबाई खरात, ज्योती शेळके, अश्विनी गायकवाड, सचिनशेठ कुलथे, उद्धव भोगे, गजानन फलके, देविदास खरात, सोमनाथ थोरात, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता प्रविण वारे, सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम ढेरे, प्रधान तंत्रज्ञ संतोष जगताप, ठेकेदार बबन खळगे आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कामिका एकादशीला कर्जत येथे कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांचा रथयात्रा उत्सव असतो. लाखो भाविक या रथयात्रेला हजेरी लावतात. ज्या भागात रथ जाईल त्या भागातील वीज पुरवठा सुरक्षिततेसाठी खंडीत करावा लागत होता. यावर्षी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या माध्यमातून ए बी केबलचे काम मंजूर झाले असून, ते सुरू करण्यात आले आहे. यावर्षीपासून रथयात्रा काळात कोठेही विद्युत पुरवठा खंडित होणार नाही. लख्ख प्रकाशात रथयात्रा पार पडेल.