म्हणून ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांचं राज्यपालांकडून कौतूक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra news :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचं सरकार यांच्यातील संबंधी ताणलेले असले तरी राज्यपालांनी एका कारणासाठी ठाकरे सरकारमधील अधिकाऱ्यांचं कौतूक केलं आहे.

एवढंच नव्हे तर या प्रशंसा पत्राची त्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सेवापुस्तिकेत नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राजभवन येथील दरबार सभागृहाच्या अंतर्गत सजावट व सुशोभिकरणाचं काम करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं राज्यपालांनी कौतूक केलं आहे.

हे काम अतिशय उत्तम आणि प्रतिकूल परिस्थिती असताना ठरवून दिलेल्या वेळी आधी केल्यानं राज्यपालांनी ही कौतूक केलं आहे. संचालक विजय रावळ, सहायक संचालक प्रसाद कडूलकर,

उद्यान अधीक्षक जयेंद्र पानसरे व सहायक पर्यवेक्षक ज्ञानेश्वर दबडे यांना राज्यपालांनी प्रशस्तीपत्र दिलं आहे. त्यांच्या सेवा पुस्तिकेत याची नोंद घेण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News