Ahmednagar Politics : तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, त्यामुळे भावनिक विधान करून जनतेची दिशाभूल करू नका. इमानदारीची मुक्ताफळं आता जेलमधून उधळावीत आणि फावल्या वेळात शेरोशायरी करायला भरपूर वेळ आहे. असा टोला आमदार राधाकृष्ण विखे विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.
खासदार संजय राऊत यांना चौकशीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे बोलतांना आ. विखे म्हणाले की, पत्राचाळीच्या घोटाळ्याबाबत जी माहिती माध्यमातून पुढे येत होती. तेव्हाच या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले होते.परंतू मी डरपोक नाही, अशा वल्गना करणारे संजय राऊत ईडीने चौकशी करीता बोलावूनही न जाता स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.

आता खऱ्या अर्थाने दूध का दूध और पानी का पानी होईल. पत्राचाळीच्या विकास करण्याच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक करून खा.राऊत यांनी महाराष्ट्राशीच बेईमानी केली, झुकेगा नही म्हणणारे संजय राऊत यांच्यावर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेण्याची आलेली
वेळ ही निष्ठावान सैनिकांशी केलेली बेईमानी म्हणावी लागेल. काँग्रेसला सतेत असतानाही किंमत नव्हती. त्यामुळे आज त्यांनी केलेल्या वक्तव्याला फारसे महत्व देत नसल्याचे विखे यांनी सांगितले.