MSRTC News : एसटी महामंडळाने आणलेली ‘ती’मोफत सेवा गुंडाळली ! वाचा नक्की काय झालं ?

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

एसटीपासून दुरावत चाललेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सेवा सुरु केली होती. मात्र अवघ्या काही वर्षातच ही सेवा गुंडाळण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे.

वायफायकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने तोटा वाढत चालला असल्याची कारण देत ही सेवा बंद करत असल्याचे वायफाय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने महामंडळाला सांगितले.

एसटीचे तोट्यातील चाक अधिकच गाळात रुतू लागले असून, तोटा कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. खासगी वाहतुकीचे एसटी पुढे मोठे आव्हान असून, एकेकाळी उन्हाळ्यात पूर्ण भरणाऱ्या बसेसमध्ये आता नगण्य प्रवासी असतात.

त्यामुळे एसटी महामंडळाकडून दरवर्षी ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबवले जाते. तरीही प्रवाशांची संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे. एसटीच्या ताफ्यात शिवशाही बसेस आणून एसटीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आहे,

मात्र हा प्रयत्न ही तितकासा यशस्वी झालेला नाही. एसटीच्या बसेस मध्ये हॉटस्पॉट वायफाय बसविण्यात आले वायफायच्या माध्यमातून मनोरंजन कार्यक्रम पाहण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली होती.

सुरुवातीला या प्रयोगाची चांगलीच हवा झाली, नंतर मात्र या सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला. काही दिवसातच ही सेवा अस्ताला गेली असून बसेसमधील ही यंत्रणा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सध्या वाय – फाय सेवा उपलब्ध होत नाही.

दळणवळणाच्या साधनांपैकी विमान व रेल्वेत मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत. खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या मनोरंजना साठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांसाठी कुठलाही मनोरंजनाची सुविधा नव्हती,

त्यामुळे महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा लावली होती. मात्र काही दिवसातच ती बंद झाली आता तर बस मधील वायफायचा डबाच गायब झाल्याने महामंडळाने यासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe