आज रोहित शर्माने केला हा अनोखा विक्रम !

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना आज संख्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला होता.

रोहितचा मुंबई इंडियन्सकडून खेळताना हा 155 वा सामना होता. 2011-2020 या कालावधीत मुंबई इंडियन्स कडून खेळताना त्याने 3992 धावा केल्या होत्या. 4000 धावा करण्यासाठी त्याला अवघ्या 8 धावांची गरज होती.

अंतिम सामन्यात त्याने पहिल्याच षटकांत षटकार ठोकला. त्यानंतर दोन धावा घेत त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 4000 धावांचा पल्ला गाठला.मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करण्याच्या फलंदाजांच्या यादीत तो प्रथम क्रमांकावर आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment