Maharashtra news:तुम्ही मुंबईत असाल किंवा आज-उद्या मुंबईला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू असून पुढील २४ तास धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
त्यामुळे मुंबईत प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे.आज दुपारी १ वाजल्यापासून ते ते शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत मुंबईत हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांनी प्रवास टाळून शक्यतो घरातच थांबावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert By IMD
पूर्वी एकदा जुलैमध्ये मुंबईत जलसंकट कोसळले होते. त्यानंतर पावसाळ्यात मुंबईत हाल ठरलेलेच आहेत. अशाच येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत जाणाऱ्यांनीही काळाता काळजी घेण्याची गरज आहे.