१९ फेब्रुवारी २०२५ सिंधुदुर्ग : आता सिंधुदुर्ग मधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे कारण पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे.
विजयदुर्ग बंदरासाठी विशेष प्रयत्न
विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली.कारण त्यांनी या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळाली आहे.

पर्यटनाची होणार भरभराट
विजयदुर्गला संपूर्ण जगभरातून ही नौका पाहण्यासाठी पर्यटक येणार असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभार लागणार आहे.या नौकेचे स्थलांतर कर्नाटक मधील बंदरातून करण्यात येणार आहे.त्यामुळे पर्यटन महामंडळाकडून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात येणार आहे.
आयएनएस गुलदार
एक शक्तिशाली युद्धनौका भारतीय नौदलाच्या लँडिंग शिप टैंक (मध्यम) श्रेणीतील आयएनएस गुलजार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ झाली आहे.आईएनएस गुलदारमध्ये अत्याधुनिक ३० मिमी क्लोज-रेंज गन आणि रॉकेट लाँचर्स आहे.या नौकेचा नौदलाच्या विविध मोहिमांमध्ये प्रभावीपणे सहभाग होता.युद्ध सज्जतेव्यतिरिक्त हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करताना अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठी सुद्धा वापरले जाते.
गुलदार नावाचा अर्थ आणि नौकेचा सागरी अभिमान
या नौकेचे गुलदार हे नाव भारतीय बिबट्याच्या (गुलदार) प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे,हे नाव नौकेची गती, ताकद आणि चपळतेचे प्रतीक आहे.
भारतीय बिबट्याचे चित्रण : वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर हिरव्या पार्श्वभूमीवर तपकिरी रंगात महासागराच्या लाटा : निळ्या आणि पांढऱ्या रंगात, जहाजाच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक बोधवाक्य ‘प्रथम आणि निर्भय’ आयएनएस गुलदार ‘प्रथम आणि निर्भय’ या बोधवाक्याला साजेसे कार्य करत,यामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडते.
विजयदुर्गसाठी नव्या पर्वाची सुरुवात
भारतीय नौदलाचे आयएनएस गुलदार हि फक्त एक युद्धनौका नसून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक ठरले आहे.अगदी लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात येणार आहे,ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व अजून वाढणार आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
नौदलात समावेश: ३० डिसेंबर १९८५, विस्थापनः १,२०० टन, लांबीः ८१ मीटर, रुंदी (बीम): १० मीटर, सक्षम अधिकारी व कर्मचारीः ६ अधिकारी आणि ८५ खलाशी, वाहन क्षमताः चिलखती कर्मचारी वाहक, रणगाडे (टैंक), स्वयं-चालित तोफा, ट्रक, १५० पेक्षा अधिक सैन्य, सामरिक सामर्थ्य आणि संरक्षण.