Mumbai News : मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर असावं असं स्वप्न अनेकांचं. पण यातील कित्येक लोकांचे हे स्वप्न पूर्ण होईल हे सांगणे थोडे कठीण. कारण म्हणजे मुंबईमधील घरांच्या किमती. अहो मुंबईत साध एक रूम अन एक किचनच घर घ्यायचं असेल तरीसुद्धा 70 ते 80 लाखांचा खर्च करावा लागतो.
आता एवढी मोठी रक्कम सर्वसामान्यांनी कुठून आणायची? याचमुळे अनेक जण म्हाडासारख्या संस्थांकडे लक्ष ठेवुन असतात. म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. अशातच आता म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

काल अर्थातच 8 एप्रिल 2025 रोजी फडणवीस सरकारने मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेतला. काल फडणवीस सरकारची राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यात मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीतील आदर्शनगर या म्हाडाअंतर्गत असणाऱ्या इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासाला मंजुरी देण्यात आली.
फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या इमारतीमध्ये सध्या जे वास्तव्याला आहेत त्या लोकांना नवीन घर मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या या लोकांकडे असणाऱ्या घरांपेक्षा त्यांना मोठं आणि नव घर मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या इमारतींचा पुनर्विकास व्हावा हा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून उपस्थित केला जातोय.
गेल्या 24-25 महिन्यांपासून या दोन्ही महत्त्वाच्या भागांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र या संदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा होत असतानाही निर्णय होत नव्हता. पण अखेरकार फडणवीस सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.
अन आता या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. म्हणजेच आता या इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर वरळीच्या आदर्श नगर येथील रहिवाशांना 800 ते 2500 चौरस फुटांची घरं मिळू शकतात तर दुसरीकडे वांद्रे रिक्लेमेशन येधील रहिवाशांसाठी 1000 ते 1200 चौरस फूट क्षेत्रफळ असणारी नवीन घर मिळू शकतात.
मात्र ही फक्त प्राथमिक माहिती आहे याबाबत नेमका काय निर्णय होणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे. या संबंधित इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेतून म्हाडाला 1 लाख 14 हजार 822 चौरस मीटर इतका विस्तीर्ण भूखंड विकासासाठी मिळणार आहे.
एवढी मोठी जागा एकाच ठिकाणी मिळाल्याने साहजिकच म्हाडाला मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करता येणार आहे. या भूखंडावर म्हाडा हजारो घरे तयार करणार आहे. ही नव्याने तयार झालेली घरे सध्याच्या रहिवाशांना तर मिळणारच आहेत शिवाय नवीन लॉटरी काढून हजारो नागरिकांचे या निमित्ताने घर खरेदीचे स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे.
मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांना या ठिकाणी भविष्यात घर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच एकिकडे स्थानिकांना पुनर्विकासानं नवीन घर मिळणार आहे तर दुसरीकडे या मोक्याच्या ठिकाणी घर घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी सुद्धा घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक सुवर्णसंधी चालून येणार आहे. यामुळे म्हाडाचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाच्या मंजुरीनंतर किती जलद गतीने पूर्ण होईल? या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरू होईल? याकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष राहणार आहे.