आम्हाला पाकिस्तानात जा म्हणणाऱ्यांनी स्वत: चालते व्हा, तुम्हाला संधी..

Published on -

नवी दिल्ली : मौलाना महमदू मदनी (Mahmood Madni) यांना पाकिस्तानात (Pakistan) जा म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. यावेळी ते जमीयत ए उलमा हिंदचे (Jamiat-e-Ulema Hind) दोन दिवसाचे राष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, या देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेले आम्ही लोक आहोत. या देशाच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही पुढे येऊ. कुणाला आमचा धर्म (Religion) सहन होत नसेल तर तुम्ही कुठे तरी निघून जा. हा देश आमचा आहे आणि या देशाचं आम्ही संरक्षण करू.

आम्हाला पाकिस्तानात जाण्याची संधी मिळाली होती. पण आम्ही गेलो नाही. उठता बसता आम्हाला पाकिस्तानात जा म्हणून सांगणाऱ्यांनी स्वत: पाकिस्तानात चालते व्हावे, असा इशारा मौलाना महमदू मदनी (Mahmood Madni) यांनी दिला आहे.

तसेच समान नागरी कायद्याच्या (same civil law) माध्यमातून आमचे संवैधानिक अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये लग्न, तलाक, कुला (पत्नीच्या इच्छेनुसार तलाक), वारसा हक्क आदी नियम कोणत्याही समाज, समूह किंवा व्यक्तीद्वारे तयार केले नाहीत.

नमाज, रोजा, हजप्रमाणेच या गोष्टी सुद्धा धार्मिक परंपर आहेत. पवित्र कुराण आणि हदीसमधून या परंपरा घेतल्या आहेत, असं यावेळी सांगत समान नागरी कायद्याच्या विरोधातील प्रस्ताव मांडण्यात आला.

मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल खपवून घेतला जाणार नाही. त्याला कठोर विरोध केला जाईल. शरियतमध्ये कुणाचीही ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असा इशारा मदनी यांनी यावेळी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe