मनोज जरांगेंच्या सभेला हजारो कार्यकर्ते जाणार

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra News : १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली ( सराटी) येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ होणाऱ्या मराठा समाजयोद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेस मराठा समाजातील सर्व बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संदीपराव बामदळे यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्व. आमदार अण्णासाहेब पाटील, स्व. आमदार विनायकराव मेटे यांच्यापासून सुरू झालेला हा लढा मराठा समाजाचे मराठा भूषण मनोज जरांगे यांनी पुढे चालू ठेवला असून, त्यांच्या लढ्याला यश येण्याचे दृष्टिक्षेपात आहे. आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी मराठा

समाजाची घोर फसवणूक केलेली आहे. मराठा समाज हा प्रामुख् शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती हलाकीची आहे. मराठ्यांची मुले पैशाअभावी शिक्षणापासून वंचित आहेत, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणे,

ही काळाची गरज आहे. एकच मिशन मराठा आरक्षण ही चळवळ पुढे चालू ठेवून सरकारला घाम फोडण्यासाठी सर्वांनी उद्या दि. १४ रोजी आंतरवाली येथे आपण मराठा आरक्षण मिळण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी आपली उपस्थिती

तेथे आवश्यक आहे. तळागाळातील सर्व समाजबांधवांनी अंतरवाली येथील सभेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी जाऊन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe