Maharashtra News : महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण आणि दररोज होणारे बदल याने राजकीय अंदाज बांधणेच कठीण होऊन बसले आहे. नुकतीच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. यात अजित पवार याना पुण्याचे पालकमंत्री घोषित केले.
त्यानंतर दादा नाराज होते किंवा इतर गोष्टींचे तर्क बांधले गेले. परंतु आता पुण्यातील एका बॅनरने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा बॅनरचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय.
या बॅनरवर जो मजकूर लिहिला आहे तो मजकूर पाहून विविध चर्चाना सुरवात झाली आहे. ‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…असे बॅनर झळकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर हे बॅनर झळकले आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून पुण्यात हे बॅनर लावण्यात आले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी हे बॅनर लावले आहे. त्यानंतर या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अजित दादा खरंच नाराज होते का ?
अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार नाराज होते अशी चर्चा होती. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करु, पण आता नाही. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार समर्थकांमध्ये २०२४ नंतर अजित पवार मुख्यमंत्री असतील अशी चर्चा आहे.
‘पालकमंत्रीपद दिले पण अधिकार नसणार’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली खरी पण त्यांना भाजपकडून पालकमंत्रीपदाचे अधिकार दिले जाणार नसल्याचा दावा शरद पवार गटाने केलाय. पुणे महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपने केलेला भ्रष्टाचार अजित पवार बाहेर काढणार नाहीत. त्यांना पालकमंत्रीपदाचे अधिकार दिले जाणार नाहीत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी लगावलाय.