२०२४ पर्यंत टोलचे उत्पन्न १ लाख कोटींनी वाढणार, सध्या किती मिळते?

Published on -

Maharashtra News:टोल वसुली होत नाही, असा रस्ता सापडणे आता दुर्मिळ होत आहे. त्यामुळे देशभरात टोल वसुलीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते.

मुख्य म्हणजे २०२४ पर्यंत यामध्ये मोठी वाढ होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच मुंबईतील एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.

सध्या टोलमधून वर्षाला ४० हजार कोटी आम्हाला उत्पन्न मिळतं. २०२४ पर्यंत हेच उत्पन्न १ लाख ४० हजार कोटीच्या आसपास असेल, असे गडकरी यांनी सांगितले.

रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेकानेक महत्वकांक्षी पोजेक्टवर काम सुरु आहे. ते लवकरत सुरू होती.

त्यामुळे अशा रस्त्यांवरही टोलवसुली सुरू होऊन टोलचे उत्पन्न वाढत जाणार आहे. मुंबईत असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या ‘NATCON 2022’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News