उद्या भाजप आणि आरपीआय कार्यकर्त्यांच्या देखील चाैकशी हाेतील – रामदास आठवले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यासह देशात सध्या ईडी हा चर्चेचा विषय बनला आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याबाबत एक महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

‘ईडी’सह केंद्राच्या सर्वच तपास यंत्रणा स्वतंत्र आहेत. त्यांचे काम ते करत आहेत. सरकार कोणाच्या चौकशा लावतेय हे आरोप चुकीचे आहेत.

ज्यांच्यावर कारवाई होतेय त्यांनी आपले कागदपत्रे दाखवावीत. उद्या भाजप आणि आरपीआय कार्यकर्त्यांच्या देखील चाैकशी हाेतील, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.

दरम्यान मंत्री आठवले हे आज अहमदनगर दौऱ्यावर हाेते. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, एक, दोन मंत्र्यांची किंवा आमदारांची चौकशी केली म्हणजे राज्यातील महाआघाडी सरकार पडेल, असे नाही.

जोपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादीपैकी एकजण आमच्यासोबत येत नाही किंवा जोपर्यंत काँग्रेस पाठिंबा काढत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार पडत नाही, हे आम्हालाही माहिती आहे. जर सरकार पडले तर ते आपल्या कर्माने पडेल, अशी टीका आठवले यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News