ट्रकला कारने जोराची धडक, अपघातात कारमधील एक जण ठार !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  नागपूर-मुंबई महामार्गावर कातकडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार झाला, तर काचालक जखमी झाला.

बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास टायर फुटल्याने मालट्रक क्रमांक एमएच १८ बीजी ५४४३ हा रस्त्याच्या कडेला उभा होता.

दरम्यान, नागपूरकडून संवत्सरकडून पुणतांबा फाटयाकडे भरधाव वेगाने जात असताना झायलो क्रमांक एमएच ०४ डीवाय ९६११ या मालट्रकला जोराची धडक दिली.

या झालेल्या अपघातात झायलो कारमधील बाबासाहेब कचरू वाहुले (३७, रा. घाटकोपर इस्ट, मंबई) हे जागीच ठार झाले, तर कारचालक सलीम चांद शेख (वय ३५, घाटकोपर) हा गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी मालट्रक मालक आनंद राजेश त्रिभुवन (नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांनी कोपरगाव शहर पोलिसांमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून कारचालक याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास ठोंबरे हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe