‘एमपीएससी’च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते.

२०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे तारीख आयोगातर्फे निश्चित करण्यात आली आहे. परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या वेळापत्रकाची प्रत आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली अाहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली.

प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते.

आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यासंदर्भात विधिमंडळानेही निर्देश दिले आहेत.

विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याने सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून

यासंदर्भात दक्षता घेण्याची विनंती आयोगातर्फे करण्यात आली आहे. परीक्षा वेळापत्रकाच्या अधिक माहितीसाठी आयोगाच्या वरील संकेतस्थळास भेट द्यावी.