अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यात शुक्रवार ४ मार्चपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यातून एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
करोना काळानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. या दृष्टीने या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान करोना महामारीमुळे मागील वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या.

राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेसंबंधीचे माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, राज्यात २,९९६ मुख्य केंद्र आणि ६,६३९ उपकेंद्रे अशा एकूण ९,६३५ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
शाखानिहाय परीक्षेला बसणारे विद्यार्थी –
विज्ञान – ६,३२,९९४
कला – ४,३७, ३३६
वाणिज्य – ३,६४,३६२
व्होकेशनल – ५०,२०२
आयटीआय – ९३२
एकूण – १४,८५,८२६
राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च २०२२ या दिवश होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल २०२२ रोजी होणार आहेत.