पुणे जिल्ह्यात येणार हे दोन प्रकल्प तब्बल पाच हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार

Ahmednagarlive24 office
Updated:

महाराष्ट्रातून चार प्रकल्प बाहेर गेल्यावरून राजकारण पेटलेले असतानाच केंद्र सरकारने आता महाराष्ट्रात तेही पुण्यात दोन मोठ्या प्रकल्पांसाठी गुंतवणूक करीत असल्याचे जाहीर केले आहे.

यातून सुमारे पाच हजार जणांना नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकल्प बाहेर जात असल्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये निर्माण झालेला राज्य आणि केंद्र सरकारविरोधातील रोष कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते.
पुणे जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा दीड हजार कोटींचा प्रोजेक्ट आणि CDAC या कंपनीचा मोठा प्रकल्प राज्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हा प्रोजेक्ट पुणे जिल्ह्यातील रांजणगावला आणला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.

१ हजार ६०० कोटींचा हा प्रकल्प असून आणखी एक कंपनीही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांनी दिली आहे. पाच हजार तरुणांना रोजगार देण्याची क्षमता या दोन कंपन्यांच्या प्रकल्पात असणार आहे.
मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe