नाशिक : हृदय आजारामुळे श्वसनाच्या त्रासाने अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या दोन रुग्णांवर एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्लिष्ट तावी शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली. जगप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट प्रा. यान कोवाच यांच्या उपस्थितीत या दोन्ही शस्रक्रिया झाल्या. एका तावी शस्रक्रियेसाठी किमान दीड तासांचा कालावधी लागतो मात्र, एसएमबीटीच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये अनुभवी आणि कुशल वैद्यकीय टीमच्या सहकार्याने दोन्ही शस्रक्रिया अवघ्या तासाभरात पार पडल्या. दोन्हीही रुग्ण सुखरूप असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती हृदयविकार तज्ञ डॉ गौरव वर्मा यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, जगप्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. यान हे एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये रविवारी विशेष भेटीसाठी आले होते. त्यांच्या उपस्थितीत हृदयविकारातील अद्ययावत उपचार प्रणाली असलेली तावी शस्रक्रिया दोन रुग्णांवर यशस्वी करण्यात आल्या. जेव्हा येथील सोयीसुविधा त्यांनी पहिल्या आणि तावीसह येथील इतर शस्रक्रियांचा खर्च त्यांना सांगितला, तेव्हा ते आवाकच झाले. एवढ्या कमी खर्चात उपचार होत असल्याने त्यांनी सर्वसामान्यांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलची आरोग्यसेवा वाखाणण्याजोगी असल्याचे म्हटले.

अतिशय आदर्शवत असे हे मॉडेल असून ग्रामीण भागात एवढे अद्ययावत उपचार होत असतील असे मला पहिल्यांदाच जाणवले. येथील सोयीसुविधा, अद्ययावत साधनसामुग्री आणि अत्याधुनिकतेची धरलेली कास यामुळे भारतातील भेट फलदायी ठरल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी, अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक व हृदयविकारतज्ञ डॉ गौरव वर्मा, डॉ विद्युतकुमार सिन्हा, सीओओ सचिन बोरसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात सर्वात अद्यायवत तावी शस्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये सातत्याने होत आहेत. तावी झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सर्वाधिक असल्याची माहिती घेऊन आपण एसएमबीटीत आल्याचे प्रा. यान म्हणाले. युरोपमध्ये तावी शस्रक्रिया करण्यासाठी रुग्णांमध्ये जनजागृती असल्यामुळे कल अधिक आहे परिणामी वेटिंगवर अनेक रुग्ण ठेवावे लागतात. भारतात ग्रामीण भागातदेखील एवढ्या अद्यायवत उपचार सुविधा उपलब्ध होत असतील तर येणाऱ्या काळात उल्लेखनीय काम एसएमबीटीसारख्या हॉस्पिटलकडून होणार असल्याचे प्रा. कोवाच म्हणाले.
प्रारंभी, एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने प्रा. यान कोवाच यांचे भारतीय परंपरेनुसार औन्क्षण करण्यात आले त्यानंतर पुष्पमाला घालून त्यांचे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्वागत केले. दरम्यान, हॉस्पिटलमधील विविध विभाग पाहिले प्रत्येक विभागात असलेली रुग्णांची गर्दी पाहून याठिकाणी हॉस्पिटल कीती गरजेचे होते याचे उत्तर मिळाल्याचे प्रा. कोवाच म्हणाले. हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, सीओओ सचिन बोरसे, SMBT हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि प्रख्यात हृदयतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा, हृदयविकार शस्रक्रिया विभागप्रमुख विद्युतकुमार सिन्हा, डॉ लिंडा, डॉ ऋषिकेश तामसेकर, डॉ स्नेहल नील, डॉ सलमान अहमद, डॉ प्रशांत पवार यांच्यासह आणि कार्डियाक टीमसोबत संवाद साधला.
येथील वातावरण, सोयीसुविधा व उपचारांमधील अत्याधुनिकता यामुळे भारतात यापुढे आलो की, एसएमबीटी हॉस्पिटलला यायला नक्की आवडेल असेही प्रा. यान म्हणाले. आधुनिक हृदयरोग उपचार पद्धती, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी क्षेत्रातील नव्या संधी आणि तावी प्रक्रियेचे जागतिक महत्त्व यावर मार्गदर्शन करत असताना आंतरराष्ट्रीय करार करण्याबाबत प्रयत्न केले जातील. नव-नवे तंत्रज्ञान, माहितीची देवान-घेवाण आणि प्रत्यक्ष अनुभव या बाबी लक्षात घेऊन पुढे वाटचाल होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर यांनी सांगितले.
प्रा. यान कोवाच यांच्या एसएमबीटी हॉस्पिटलमधील भेटीनंतर सायंकाळी नाशिक शहरातील हृदयविकार तज्ञांसाठी विशेष सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरासह पंचक्रोशीतील ५० ते ६० हृदयविकार तज्ञ व हृदयविकार शस्रक्रिया तज्ञ व फिजिशियन्स उपस्थित होते. अद्ययावत तंत्रज्ञानाने काळानुसार उपचारप्रक्रियांत बदल करणे क्रमप्राप्त होत चालले असून एसएमबीटीने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे ज्ञानात भर पडत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.
तावी शस्रक्रिया म्हणजे काय?
ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे. ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते.
ग्रामीण भागातील अत्याधुनिक सुविधा पाहून आवाक
ग्रामीण भागात हॉस्पिटल असले तरी कनेक्टीव्हीटी या हायवेमुळे (समृद्धी महामार्ग) वाढली आहे. अन्जिओग्राफी, अंजिओप्लास्टी, बायपास, डिव्हाइस क्लोजर अशा प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुविधा याठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या प्रकारे असलेले कार्य खरच प्रेरणादायी आणि प्रशंसात्मक आहे. पैशांच्या किंवा बिलाच्या अभावी रुग्ण रुग्णालयातून परत जाऊ नये हा हॉस्पिटलचा उद्देश अभिमानास्पद आहे.
प्रा. यान कोवाच, जगप्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट
एसएमबीटीत ५० टक्के सवलतीत तावी शस्रक्रिया एसएमबीटीचा हृदयविकार विभाग हा महाराष्ट्रातील सर्वात अद्ययावत हृदयविकार विभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी मोठे काम होत आहे. यावर्षी २०२५-२६ मध्ये तावी शस्रक्रीयांसाठी ५० टक्के सवलत दिली जात आहे. दिल्ली, मुंबई व पुणे सारख्या रूग्णालयापेक्षाही याठिकाणी उपचार खर्च हा ५० टक्के कमी आहे. उपचार कमी खर्चात करत असताना कुठल्याही प्रकारे रुग्णांच्या उपचारांचा दर्जा, गुणवत्ता यात तडजोड केली जात नाही. तसेच तावीसाठी वापरला जाणारा ईंडीजीनस वॉल्व्ह व त्याची गुणवत्ता खूप चांगली असून रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे – डॉ गौरव वर्मा, संचालक, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट