Udayanaraje : आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा, दुःखद प्रसंगात उदयनराजे सहभागी

Ahilyanagarlive24 office
Published:

Udayanaraje : खासदार उदयनराजे आणि सातारचे एक वेगळेच नाते आहे. याची प्रचिती अनेकदा येते. आता उदयनराजे भोसले यांना सातारा शहरातील एक दु:खद बातमी मिळाली. मल्हारपेठ भागातील सुप्रसिद्ध वकील आजिजभाई बागवान यांची पत्नी रजीया बागवान यांचे निधन झाले, ही ती बातमी होती.

उदयनराजे भोसले आणि आजिजभाई बागवान यांच्यात खूप वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. यामुळे उदयनराजे थेट त्यांच्या घरी गेले. त्यावेळी उदयनराजे यांनी रजीया बागवान यांचं अंत्यदर्शन घेतले.

तसेच मुस्लीम समाजातील रजिया बागवान यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. उदयनराजे भोसले यांनी रजीया बागवान यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यामुळे याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून उदयनराजे आणि त्यांचे असलेले संबंध दिसून येतात.

उदयनराजे भोसले सुरुवातीला नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले होते. साताऱ्यातील ज्या वार्डातून विजयी झाले होते तिथं मुस्लीम मतदारांची संख्या अधिक होती. हा समाज त्यांच्या पाठीमागे कायम राहिला आहे.

सातारा शहरातील मुस्लीम मतदार देखील गेली अनेक वर्ष उदयनराजे यांच्या पाठिशी राहिले आहेत. उदयनराजे भोसले हे अनेकदा भावूक झाल्याचे दिसून येतं. उदयनराजे भोसले यांनी सातारकरांवर विशेष प्रेम असल्याचं अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमातून सांगितले आहे.

सातारकरांच्या आनंदाचा असो किंवा दुःखाचा उदयनराजे त्यात समरूप होऊन जातात. याचा पून्हा एकदा प्रत्यय आला आहे. सध्या याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe