UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते.
या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक अवघड प्रश्न आहेत, जे तुमच्या मनाला चक्रावून टाकतील.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. म्हणूनच UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी तुम्हाला ज्ञान असणे तुम्हाला आवश्यक आहे.
म्हणूनच येथे आम्ही तुम्हाला UPSC (IAS) मुलाखतीत विचारलेल्या अशाच काही अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची माहिती देत आहोत. हे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुम्हाला या अवघड प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याची थोडीशी कल्पना येईल.
प्रश्न : भारताचा एकूण किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे?
उत्तर : ६०%
प्रश्न : शौचालय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर : १९ डिसेंबर
प्रश्न : वंदे मातरम हे वृत्तपत्र एकूण किती जागी सुरु करण्यात आले होते?
उत्तर : तीन
प्रश्न : १२ सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर : राष्ट्रपती
प्रश्न : ४५१ किलोमीटर ही महाराष्ट्रातील कोणत्या नदीची लांबी आहे?
उत्तर : भीमा नदी
प्रश्न : कोणत्या कंपनीचा कमवलेला पैसा ९० टक्के दान केला जातो?
उत्तर : रोलेक्स कंपनी (घड्याळ)