UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नाची यादी दिलेली आहे.
दरम्यान, UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : ‘सातपुडा’ पर्वतावर कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
उत्तर : चिखलदरा, पंचमडी
प्रश्न : अकोला जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे?
उत्तर : नरनाळा किल्ला
प्रश्न : महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते?
उत्तर : १० लाख
प्रश्न : महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात कोणती मृदा आहे?
उत्तर : रेगूर मृदा
प्रश्न : दर दोन वर्षांनी राज्यसभेचे किती सभासद निवृत्त होतात?
उत्तर : १/३ सभासद
प्रश्न : पुणे- सोलापूर या मार्गावर धावणारी रेल्वे कोणती आहे?
उत्तर : हुतात्मा एक्सप्रेस