UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करताना विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न इथे दिलेले आहेत.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : भारताचे सध्याचे १५वे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर : द्रौपदी मुर्मू
प्रश्न : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
उत्तर : १९५८
प्रश्न : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
उत्तर : अजित डोवाल
प्रश्न : क्रांती मैदान कोणत्या शहरात आहे?
उत्तर : मुंबई
प्रश्न : सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती सेकंदाचा वेळ लागत असतो?
उत्तर : ५०० सेकंद
प्रश्न : लोकसभेच्या सर्वात जास्त जागा कोणत्या राज्याकडे आहेत?
उत्तर : उत्तर प्रदेश राज्य