UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचाअभ्यास करणाऱ्यांसाठी ही बातमी खास आहे. कारण UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला कोण संबोधित करत असतो?
उत्तर : पंतप्रधान
प्रश्न : भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो?
उत्तर : शांतता आणि सत्य
प्रश्न : ज्ञानाचे अथांग महासागर असे कोणाला संबोधले जाते?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न : भारतातील दुधाच्या उत्पन्नातील आघाडीचे राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तर प्रदेश
प्रश्न : लोकशाहीचा पाळणा असे कोणाला मानले जाते?
उत्तर : स्थानिक स्वराज्य संस्था
प्रश्न : चंद्रावरील प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : १. ३ सेकंद