मुंबईकरांसाठीं अत्यंत महत्वाची बातमी ! तीन दिवस महत्वाचे… रेल्वेवर विशेष ब्लॉक ! पहा वेळापत्रक

Mahesh Waghmare
Published:

मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, शुक्रवार, 17 जानेवारी आणि रविवार, 19 जानेवारी या दोन दिवशी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कर्जत स्टेशन येथे अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याने बदलापूर ते खोपोली आणि नेरळ ते खोपोली दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या दिवसांचे नियोजन करताना प्रवासाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने “मुंबईकरांनी बाहेर पडण्यापूर्वी ब्लॉकशी संबंधित वेळापत्रक तपासावे आणि त्यानुसार आपली व्यवस्था करावी,” असे आवाहन केले आहे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा तिकीट बुकींग अॅपवरून अधिकृत माहिती मिळवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कसा असेल ब्लॉक आणि कोणत्या मार्गावर परिणाम होणार?

शुक्रवार, 17 जानेवारी
ब्लॉक कालावधी: दुपारी 1.50 ते 3.35
प्रभावित सेवा: बदलापूर ते खोपोलीदरम्यानची उपनगरी लोकल सेवा बंद
ब्लॉकचा परिसर:
पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) ते कर्जत स्थानक (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाईन
कर्जत (कर्जत प्लॅटफॉर्म ३ च्या पनवेल दिशेकडे क्रॉसओव्हरसह) ते चौक, भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाउन लाईन

रविवार, 19 जानेवारी
ब्लॉक कालावधी: दुपारी 11.20 ते 1.05
प्रभावित सेवा: नेरळ ते खोपोलीदरम्यानची उपनगरी लोकल सेवा बंद
ब्लॉकचा परिसर:
पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) ते कर्जत स्थानक (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाईन
कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक, भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाउन लाईन

प्रवाशांसाठी सूचना
या ब्लॉकमुळे मुंबईहून खोपोली/नेरळमार्गे जाणाऱ्या उपनगरी लोकल सेवांवर परिणाम होणार आहे.
या कालावधीत काही लोकल सेवा रद्द अथवा ठरावीक स्थानकांदरम्यानच धावतील.
प्रवास करणाऱ्यांनी या बदलांची नोंद घेऊन आपले प्रवासाचे नियोजन करावे.
कामानिमित्त प्रवास करणाऱ्या किंवा शनिवार-रविवारी सहलीला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा विचार करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe