विशाल निकम ठरला ‘बिग बॉस 3’ चा विजेता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. दरम्यान तिसऱ्या सीझनचा विजेता घोषित झाला आहे. विशाल निकम हा ‘बिग बॉस मराठी सिझन 3’चा महाविजेता ठरला आहे.(Bigg Boss 3)

दरम्यान विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. घराघरांत ‘बिग बॉस मराठी 3’ कार्यक्रमाची चर्चा सुरू होती.

टॉप 5 मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. 17 सदस्यांसोबत सुरू झालेला 100 दिवसांचा प्रवास आता संपला आहे.

दरम्यान बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीमध्ये जय, विशाल, विकास, उत्कर्ष आणि मीनल शहा हे पाच स्पर्धक Top 5 फायनलिस्ट ठरले होते.

परंतु, ग्रँड फिनाले सुरु झाल्यानतंर अवघ्या काही वेळातच मीनल आणि उत्कर्ष यांना या शोचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ विकास पाटील याचाही प्रवास येथीच संपला.

त्यामुळे शेवटी जय आणि विशाल यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर आज बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली.

विशाल निकम हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. विशाल निकमला 20 लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News