Jayakwadi Dam : पाणीवाटप कायद्यातील तरतुदीनुसार जायकवाडीसाठी पाणी जाणार !

Ahilyanagarlive24 office
Published:

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून याअंतर्गत मुळा धरणातून १२.२० टीएमसी पाणी जायकवाडीला जाणार आहे.जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात तूट असल्याचा

निष्कर्ष काढून समन्यायी पाणीवाटप कायद्यातील तरतुदीनुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता (प्रशासक) यांनी गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांवरील धरणांमधून ८.६ टी.एम.सी. पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे उर्ध्व जायकवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यात १५ ऑक्टोबर रोजी धरणांतील पाणी साठ्याचा आढावा घेऊन धरणातील धरणसाठ्यांची टक्केवारी समान असावी, अशी तरतूद आहे.

या तरदीनुसार याबाबतच निर्णय होऊन दि. ३० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. यानुसार मुळा व मांडओहोळ प्रकल्प (२.२० टी. एम. सी.), भंडारदरा, निळवंडे, आढळा,

भोजापूर प्रकल्प ( ३.३६ टी.एम. सी.), गंगापूर, कश्यपी, गौतमी प्रकल्प (०.५० टी.एम.सी), दारणा, कडवा, भाम, दारणा, आळंदी, मुकणे समूह (२.६० टी.एम.सी) असे एकुण ८.६ टी.एम.सी. पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणार आहे.

पाणी नेमके कधी सोडावे, याबाबत आदेशात उल्लेख नसला तरी लवकरच याबाबतची अंमलबजावणी होईल आसे समजते. या निर्णयामुळे गोदावरी, मुळा, प्रवरा नद्यांवरील धरणांचे लाभक्षेत्रातील लाभधारकांमध्ये खळबळ उडाली असून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe