अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- राज्य सरकारमध्ये काय चाललय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही. अन जनतेलाही कळत नाही. काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्ये आम्ही दारूबंदी केली, हे सरकार सत्तेवर आलं नाही तोपर्यंत दारुविक्री पुन्हा सुरू केली.
आता केवळ चंद्रपूरला दारु सुरु करून थांबले नाहीत, तर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत. अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारावर केली आहे.

पुढे बोलताना म्हणाले, आज वाईनविकायला लागलेत, उद्या बियर विकतील ,पुढे दारु विकायला लागतील. या सरकारला उत्पन्न पाहिजे असेल तर अनेक उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
पानटपरीवर दारु विकून किंवा दुकानात विकून पैसा उभा करणं ही महाराष्ट्रातील संस्कृती अशी नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे अजित पवार काय बोलले मला माहिती नाही पण वाईन मध्येही अल्कोहोल असतं.
उद्या ते असही म्हणतील की महिलाही पिल्या तरी चालतील. आमच्या सरकारने कोणत्याही राज्यात दारु विक्रीचा निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही असेही ते म्हणले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम