मराठा आरक्षणाबाबत असलेल्या भावना व मागणी सरकारपर्यंत पोहचवू – आ. राम शिंदे

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मराठा आरक्षणाबाबत असलेल्या आपल्या भावना व मागणी सरकारपर्यंत पोहचवू, असे आश्वासन आ. राम शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्याचे माजीमंत्री तथा आ. प्रा. राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले, या वेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण केल्यानंतर जरांगे हे सध्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, ६ ऑक्टोबर रोजी ते जामखेड तालुका दौऱ्यावर आले होते. जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जामखेड येथील जुन्या तहसील कार्यालयासमोरील मैदानात सभा झाली.

दरम्यान, शहरात आगमन होण्यापूर्वी जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथे भेट देऊन होळकर यांच्या समाधीस अभिवादन केले.

दरम्यान, रात्री जरांगे यांचे सभास्थानी आगमन झाले. जरांगे हे सभास्थानी दाखल होण्याआधी आ. शिंदे हे सर्वसामान्य श्रोत्याप्रमाणे जनतेत जाऊन बसले होते. जरांगे यांचे भाषण सुरू होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी आ. राम शिंदे यांना निवेदन दिले.

सकल मराठा समाजाच्या भावना सरकार दरबारी कळवाव्यात, असे साकडे या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिंदे यांना घातले. आपल्या भावना व मागण्या सरकारपर्यंत पोहचवू, असे या वेळी आ. शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

शिष्टमंडळात अण्णासाहेब सावंत, सभापती पै. शरद (दादा) कार्ले, रविंद्र सुरवसे, पवन राळेभात, राहुल उगले, विजयसिंह गोलेकर, दिगंबर चव्हाण, प्रा. सचिन सर गायवळ, डॉ. भगवान मुरुमकर, सोमनाथ राळेभात, बिभिषन धनवडे, पांडुरंग उबाळे, ॲड. निकम, प्रविण बोलभट, राम पवारसह आदींचा समावेश होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe