मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द झाला असून या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही अयोध्या दौऱ्यासाठी त्यांना सहकार्य केलं असतं, असा चिमटा काढला आहे.
मीडियाशी संवाद साधताना राऊत म्हणाले, राज यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच सहकार्य केलं असतं, राज यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असं मी म्हणणार नाही, असं सांगतानाच भाजपने मात्र असं का करावं? असा सवाल करत राज यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजपच असल्याचं सूतोवाचही राऊत यांनी केले आहे.

तसेच राऊत म्हणाले, अयोध्येत इतर पक्षाचे काही कार्यक्रम होते. त्यांनी ते रद्द केले. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्कीच दिलं असतं. शेवटी अयोध्या आहे.
शिवसेनाला मानणारा वर्ग अयोध्येत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी आणि इतरांनी शिवसेनेला नेहमीच सहकार्य केलं आहे. त्यांना आम्ही नक्कीच मदत केली असती, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
दरम्यान, त्यांच्यावर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असा शब्द मी वापरणार नाही. काय अडचणी आहेत माहीत नाही. भाजपनं (Bjp) असं का करावं? पण ठिक आहे. यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल. यातून नुकसान होतं हे काही लोकांना उशिरा समजतं.
काही लोक तिर्थयात्रेला जात असतात. तेव्हा यात्रेत काही अडचणी येतात. तेव्हा लोक विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचा मदतकक्ष आहे या संदर्भात, अयोध्या, वाराणासीत हा मदत कक्ष आहे. आम्ही धार्मिक लोकं आहोत. कुणाला काही अडचण असेल तर मदत करतो. आम्ही राजकारणाचा अभिनिवेश मागे ठेवतो, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.