काय सांगता ! ‘अशाही’ असतात नोकऱ्या ? वाचून थक्क व्हाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-  आज सर्वच लोकांना नोकरी करण्याची इच्छा असते. यापाठीमागे महत्वाचे कारण म्हणजे दैनंदिन गरजांची पूर्तता.

हव्या असलेल्या सोयी सुविधांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येकाला जॉबची आवश्यकता असते. यासाठी अनेक लोक विविध प्रकारच्या नोकऱ्या करत असतात.

अनेक नोकऱ्या या खूपच किचकट आणि कष्टप्रद असतात. परंतु समाजात अशा अनेक नोकऱ्या आहेत की त्या अफलातून आहेत. त्या ऐकून तुम्ही अगदी थक्क व्हाल. वाचा त्यांविषयी- भाड्याचा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड देण्यासाठी ह्युमन टचला सर्वात मोठी हीलिंग पॉवर म्हणून ओळखले जाते.

तुम्ही ८ हजार रुपये तासाला देऊन तुमच्यासाठी प्रेमाचा स्पर्श घेऊ शकता. अनेक कंपन्या अशाप्रकारची सर्व्हिस देत आहेत. तुम्ही ही सुविधा आयुष्यभरासाठीसुद्धा घेऊ शकता. शॅम्पेन फेशियल स्पेशालिस्ट हा एक रोमांचक जॉब आहे. यामध्ये पार्टीत जाऊन मुलींना शॅम्पेन फेशियल द्यावे लागते. हे शॅम्पेन फेशियल नॉर्थ अमेरिकेतील क्लबमध्ये क्रिरिल बिचुतकस्की नावाचा एक फोटोग्राफर आहे, ज्याने सुरु केले आहे.

यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. जर तुम्ही फोटोमध्ये पोझ देण्यासाठी परफेक्ट असाल तर तुम्ही प्रोफेशनल ब्राइडमेड्स हा जॉब करू शकता. यासाठी २० हजारापासून ते १ लाखापर्यंत पैसे दिले जातात. पायात चप्पल घालण्याची देखील नोकरी काही शूज कंपन्या देत असतात.

या नोकरीत तुम्हाला अजिबात कष्ट करायचे नाहीत. आपल्याला चप्पल परिधान केल्यावर आपल्याला कसे वाटले आणि चप्पल किती आरामदायक आहे ते सांगावे लागेल.

या कामासाठी तुम्हाला 4 लाख रुपये मिळतील. स्लीपर टेस्टर असे या जॉबचे नाव आहे. अशा व्हॅकन्सी काढणारी कंपनी यूके आधारित बेडरूम अ‍ॅथलेटिक्स आहे. गेल्या वर्षी बेडरुम अ‍ॅथलेटिक्सने अशाच प्रकारच्या नोकर्‍या दिल्या होत्या. मागील वर्षी, अशीच एक नोकरी समोर आली.

ज्यात आपल्याला बिस्किटांचा स्वाद घ्यावा लागनार होता. बिस्किटे चाखण्यासाठी कंपनीने वार्षिक 40 लाख रुपये देण्यास सांगितले होते.

म्हणजेच मासिक वेतन 3 लाख रुपयांपेक्षा जास्त होते. या नोकरीसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना टेस्ट व बिस्किटांचे ज्ञान असावे असे कंपनीने म्हटले होते. त्यांजवळ लीडरशिप स्किल आणि कम्युनिकेशनचेही समज असणे आवश्यक होते. बिस्किट चाखण्याची नोकरी यूकेमध्ये स्कॉटिश बिस्किट निर्मात्या कंपनीने ऑफर केली होती.

मास्टर बिस्किटरला एका वर्षात 40 हजार पौंड देण्याची घोषणा केली होती. जर तुम्हाला आईस्क्रीम खूप आवडत असेल तर आईस्क्रीम टेस्टर हा जॉब तुमच्यासाठीच आहे.

यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम टेस्ट करून त्यांना नाव द्यावे लागते. विविध कंपन्या असे जॉब ऑफर करतात. जर तुम्हाला झोपण्यासाठी पैसे भेटत असतील तर यासारखा दुसरा चांगला जॉब असूच शकत नाही. नासा प्रोफेशन स्लीपर्सला हायर करते. या लोकांवर सायंटिफिक रिसर्च केला जातो. यासाठी यांना पगार दिला जातो. वर्षाला ४० लाख रुपये या लोकांना केवळ झोपण्यासाठी दिले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment