वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये केलं नको ते कृत्य ! अखेर त्या तरुणास अटक

Ahilyanagarlive24 office
Published:

Vande Bharat Express : तिरुपती- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे गोंधळ झाल्याची घटना बुधवार, ९ ऑगस्ट रोजी घडली. आरपीएफने त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेन क्रमांक २०७०२ तिरुपती- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सी-१३ कोचमधील टॉयलेटमध्ये स्वतःला कोंडून घेतले.

शौचालयाच्या आत अनधिकृतपणे तो प्रवासी धूम्रपान करत होता. ट्रेनमधील स्वयंचलित एरोसोल अग्निशामक यंत्रणेने सिगारेटची आग विझवण्यासाठी पावडरसारखा धूर सोडला. यावेळी ट्रेनमधील प्रवासी घाबरले आणि इमर्जन्सी टॉक बॅक युनिटद्वारे गार्डला सावध केले.

तत्काळ आरपीएफचे जवानही आग विझवण्यासाठी सी-१३ कोचकडे धावले. दरम्यान, घटनेनंतर मार्गावरील मनुबोलू येथे गार्डने तत्काळ ट्रेन थांबवली. प्रवाशांना वाचवण्यासाठी टॉयलेटच्या खिडकीच्या काचा बाहेरून फोडल्या. घटनेला जबाबदार प्रवाशाला आरपीएफने ताब्यात घेतले असून रेल्वे कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe