अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- नागापूर येथील एमआयडीसीतील सी. जी. पॉवर अॅण्ड इंडस्ट्रीज सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत काम करणार्या नोकराने कंपनीतील दोन हजार रूपये किंमतीची कॉपर वायरचे बंडल चोरून नेले.
कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने नितीनकुमार रघुनाथ वट्टमवार (वय 38 रा. एकवीरा चौका, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नोकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण प्रभाकर डागवाले (वय 31 रा. आंधळे-चौरेनगर, वडगाव गुप्ता ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे.
डागवाले हा कंपनीत कामास त्याने शर्टच्या आतील बाजुला दोन हजार रूपये किंमतीचे कॉपर वायरचे बंडल गुंडाळून कंपनीतून बाहेर पडत होता.
कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी तपासणी केली. त्यावेळेस त्याच्याकडे कॉपर वायरचे बंडल आढळून आले. त्यांनी ही बाब कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली.
कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने वट्टमवार यांनी चोरीची फिर्याद पोलिसांत दिली आहे. आरोपी डागवाले यास पोलिसांच्या देण्यात आले आहे. पोलीस नाईक संदीप चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम